June 23, 2025

मोहेकर महाविद्यालयाचे लॉन टेनिस स्पर्धेत यश

  • कळंब – नुकत्याच बिड येथे पार पडलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर आणि मिलिया महाविद्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित पुरुष लॉन टेनिस स्पर्धेत एकूण आठ संघानी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब महाविद्यालयाने अंतिम सामन्यात एमआयटी महाविद्यालयाचा 2 विरुद्ध 1 एवढ्या फरकाने विजय मिळवला.
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील स्वराज भिसे व स्वराज देशमुख यांचा पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेनिस स्पर्धेत निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार ,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान ,डॉ .के.डी. जाधव क्रिडा शिक्षक डॉ. आप्पासाहेब बोंदर,प्रा.सूरज गपाट व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
error: Content is protected !!