March 26, 2026

ज्ञान प्रसार मध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

  • मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्तीदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
    याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय समिती सदस्य विशाल कसबे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत
    मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.याप्रसंगी आयात आमीर पठाण,आतिफ अस्लम पठाण, आदिती अमोल मडके, आल्फिया आजम पठाण व सिमरन समीर पठाण या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व गितांमधून मराठवाडा मुक्तीसंग्रामाविषयी माहिती दिली. याप्रसंगी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
    ज्ञान प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

  • त्यानंतर मोहा गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली व खाऊवाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. नवनाथ करंजकर यांनी केले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक संजय मडके, सहशिक्षिका निता सोनवणे, उषा पांचाळ,प्रा.प्रतिभा सावंत आदींनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!