कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा.डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस प्राचार्य सतिश मातने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे,प्रा.अविनाश घोडके, निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशिका कोमल मगर,निदेशक राजकुमार शिंदे,आदित्य गायकवाड, विनोद कसबे,सोनाली ढमाले आदींची उपस्थिती होती.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी