धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.05 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 196 कारवाया करुन 1,60,300 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे-शंकर दाम्मना विटकर, वय 42 वर्षे, रा.मुळज रोड कोळीवाडा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.06.09.2024 रोजी 19.20 वा. सु. शिवाजी कॉलेजच्या पाठीमागे अंदाजे 7,000 ₹ किंमतीची 70 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
मुरुम पोलीस ठाणे: आरोपी नामे-मल्लया नागय्या गुत्तेदार, वय 50 वर्षे, रा.येणेगुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.06.09.2024 रोजी 18.00 वा. सु. विनोद बारचे पाठीमागे येणेगुर येथे अंदाजे 4,000 ₹ किंमतीची 40 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-महेश भारत सोमवंशी, वय 39 वर्षे, रा.अचलेर ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.06.09.2024 रोजी 19.50 वा. सु. अचलेर येथील बसस्थानक चौकात अंदाजे 910 ₹ किंमतीच्या 18 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: आरोपी नामे-अनिता दशरथ काळे, वय 45 वर्षे, रा.पापनाशनगर धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.06.09.2024 रोजी 19.10 वा. सु. पापनाश नगर धाराशिव येथे अंदाजे 6,000 ₹ किंमतीची 60 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे- कुणाल अनिल पवार, वय 27 वर्षे, रा.भोसले हायस्कुल समोर तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.06.09.2024 रोजी 19.20 वा. सु. भोसले हायस्कुल समोर तांबरी विभाग येथे अंदाजे 2,240 ₹ किंमतीची28 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे- दिलीप हरीचंद्र बनसोडे, वय 50 वर्षे, रा.अजिंठा नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.06.09.2024 रोजी 19.50 वा. सु. कमलाकर बनसोडे यांचे घरासमोर अजिंठा नगर धाराशिव येथे अंदाजे 3,200 ₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे- कुलदीप भागवत काळे, वय 32 वर्षे, रा. बोर्डा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.06.09.2024 रोजी 12.20 वा. सु.आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप क्र एमएच 25 पी 4735 हे होळकर चौक कळंब येथे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-भैरवनाथ बळीराम केमदरे, वय 28 वर्षे, रा. रोपळे ता. माढा जि. सोलापूर हे दि.06.09.2024 रोजी 12.30 वा. सु.आपल्या ताब्यातील पिकअप क्र एमएच 45 -6804 हे एनएच 52 रोडवर येडशी टोलनाका येथे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना धाराशिव ग्रामीण पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये धाराशिव ग्रामीण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-विशाल दिलीप वायकुळे, वय 33 वर्षे, रा.ब्राम्हण गल्ली अंबेजवळगे ता. जि. धाराशिव ह.मु. साईराम नगर धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 25 ए.यु. 6851 जिचा चेसी नं ME4KC401GMA293562 व इंजिन नं KC40EA0292987 ही दि.04.09.2024 रोजी 23.00 ते दि.05.09.2024 रोजी 06.00 वा. सु. साईरामनगर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विशाल वायकुळे यांनी दि.06.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-पिंकी शैल्या शिंदे, वय 35 वर्षे, रा.निलेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 70,000₹ किंमतीची होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.झेड. 5822 जिचा चेसी नं MA4JC85JJpG053085 व इंजिन नं JC85EG3063495 ही दि.05.09.2024 रोजी 01.30 ते04.00 नळदुर्ग येथील पटांगणातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पिंकी शिंदे यांनी दि.06.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-शिल्पा सिध्दनाथ पंढरपुरकर, वय 43 वर्षे, रा.श्रीकृष्णनगर धाराशिव येथे जि. धाराशिव यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची स्कुटी मोटरसायकल क्र एमएच 25 वाय 3553 जिचा चेसी नं MBLJF16EFCGJ05593 व इंजिन नं JF16ECCGJ05522 ही दि.28.08.2024 रोजी 11.00 ते 17.00 वा.सु. मध्यवर्ती बिल्डींग पार्कींग मधून धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिल्पा पंढरपुरकर यांनी दि.06.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-दत्तात्रय केरबा वनवे, वय 49 वर्षे, रा.उपळाई ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. काकडे प्लॉट धाराशिव जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000 ₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 AM 7379 जिचा चेसी नं ME4JC657LH7053510 व इंजिन नं JC65E71323317 ही दि.02.09.2024 रोजी 21.30 ते दि. 03.09.2024 रोजी 05.00 वा.सु. काकडे प्लॉट धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दत्तात्रय वनवे यांनी दि.06.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-अनिल मारुती थोरात, वय 42 वर्षे, रा.मिरवडी ता. दौंड जि. पुणे जि. धाराशिव हे दि. 06.09.2024 रोजी 05.30 वा. सु. टेम्पो क्र एमएच 11 सी जे 4151 टेमृपो रिलायन्स डिजीटल या कंपनीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे येथुन घेवून लातुर येथे जमा करण्यासाठी जात असताना ढोकी ते तडवळ जाणारे रोडवर टी पॉईटच्या बाजूला टेम्पोमधील रिअलमी कंपनीचा टी.डब्ल्यु एस बॉक्स, इलंक्टरॉनिक आयटम 08 मोबाईल एक बॉक्स, फॅबिनो ज्युपिटर 1200 एमएम कंपनीचे पॅक 02 असलेल्या बॉक्स 02 एल ई डी टिव्ही,डब्ल्यु पी ग्रेसीआ अल्कालाईन 7.5 मिटर एक बॉक्स असा एकुण 1, 67, 118 ₹ किंमतीचे सामान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. फिर्यादी नामे-अनिल थोरात यांनी दि.06.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अंबी पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-बाबुराव केरबा महानवर, वय 52 वर्षे, रा.कंडारी ता. परंडा जि. धाराशिव यांच्या अंदाजे 60,000 ₹ किंमतीच्या 6 शेळ्या व 6 पिल्ले या दि.04.09.2024 रोजी 01.45 वा.सु. कंडारी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाबुराव महानवर यांनी दि.06.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ खुन.”
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-दत्ता आबा शिंदे, आबा मच्छिंद्र शिंदे, दोघे रा. खैराट वस्ती वाशी जि. धाराशिव यांनी दि. 06.09.2024 रोजी 08.00 वा. सु. खैराट वस्ती वाशी येथे मयत नामे- सोनाबाई दत्ता शिंदे, वय 25 रा. खैराट वस्ती वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी चारीऱ्यावर संशय घेवून बंदुकीने गोळ्या घालून जिवे ठार मारले आहे. व मयताचे वडीलास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वसंत देवराव काळे, वय 65 वर्षे, रा. पारा ता. वाशी जि.धाराशिव यांनी दि.06.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 103(1), 351(3), 3(5) सह कलम 3, 9, 25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-सुनिता चंदनशिवे, रागिणी चंदनशिवे, रुक्मीणी चंदनशिवे, हनुमंत चंदनशिवे, दिनेश हनुमंत चंदनशिवे, सर्व रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 06.09.2024 रोजी 12.00 वा. सु. वाघोली येथे फिर्यादी नामे- सोजराबाई पांडुरंग गायकवाड, वय 70 वर्षे, रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव या कळशी चोरीला गेल्यामुळे शिव्या देता असताना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सोजराबाई गायकवाड यांनी दि.06.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189(2), 191(1), 190, 115(2), 351(2)(3), 352, न्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-सगजान दिगंबर चंदनशिवे, सोजर पांडुरंग गायकवाड, दोघे रा. वाघोली ता. कळंब,बायणी बगाडे, सोजन गायकवाड,आश्राबाई गरुड, अमर अहिरे,अजय गरुड, पांडुरंग गायकवाड रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 06.09.2024 रोजी 12.00 वा. सु. वाघोली येथे फिर्यादी नामे- सुनिता करण चंदनशिवे, वय 30 वर्षे, रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी कळशी का चोरीला या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विटाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची सासु व मुलगी या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यासही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुनिता चंदनशिवे यांनी दि.06.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189(2), 191(1), 190, 115(2), 351(2)(3), 352, 118(1) न्वये गुन्हा नोंदवला आहे.
“अपघात.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: मयत नामे-रत्नदिप रोहीदास झेंडे, वय 32 वर्षे, रा. तांबरी विभाग लिंबोणी बाग धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.05.05.2024 रोजी 15.00 वा. सु.उपळा शिवारात व्ही.आर.स्विमींग पुल वरुडा रोड येथे पोहण्यासाठी गेला असता त्यास पोहता येत नसल्याने त्याने व्ही आर स्वीमींग सेंटर पुल व्यवस्थापक व सुरक्षा रक्षक यांना कळवून देखील व्ही. आर. स्वीमींग पुल व्यवस्थापक आरोपी नामे हनुमंत श्रीमंत तांबे, अभय हनुमंत तांबे, प्रशांद मुंदडा यांनी याग्ये खबरदारी न घेता दुर्लक्ष व निष्काळजीपणा केल्यामुळे रत्नदिप झोंडे हे पाण्यात बुडाला असता नमुद आरोपींनी मयत यास उशीरा पाण्याचे बाहेर काढल्याने त्यास वेळेत औषध उपचारास घेवून न गेल्याने रत्नदिप झेंडे हे मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रोहीदास भगवान झेंडे, वय 68 वर्षे, रा. तांबरी विभाग लिंबोणी बाग गणपती मंदीराचे पाठीमागे धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.06.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 304(अ), 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”
तुळजापूर पोलीस ठाणे :मयत नामे-चेतन शिवाजी जाधव, वय 39 वर्षे रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.03.09.2024 रोजी 13.00 वा. दरम्यान सिंदफळ येथे गळफास घेउन आत्महत्या केली. आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन आरोपी नामे- व्यंकट बाळासाहेब सुर्यवंशी, व्यंकट सुर्यवंशी यांची पत्नी, मुलगा पुतण्या सर्व रा. कोंडवा (बु) पुणे यांनी चेतन जाधव यांचे कडून उसणे घेतलेले पैसे परत न दिल्याने चेतन यांनी निराश होवून त्यांचे त्रासास कंटाळुन गळफास घेवून आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची पत्नी फिर्यादी नामे- सुमित्रा चेतन जाधव यांनी दि. 06.9.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम- 108, 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश