धाराशिव – मुस्लीम समाजाविषयी वादग्रस्त विधाने करुन जातीय तेढ निर्माण करणार्या आमदार नितीश राणे यांस तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करावी,अशी मागणी धाराशिव येथील मुस्लीम बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसापासुन मानसिक संतुलन बिघडलेले आमदार नितीश राणे जाणुनबुजुन विशेषतः मुस्लीम समाजाला लक्ष्य करण्याच्या हेतुने जातीवाचक वादग्रस्त विधान करीत आहेत. त्यांचा हेतु दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन जातीय दंगल घडविण्याचा कट आहे. दि. 1/09/2024 रोजी अहमदनगर येथील एका जातीयवादी संघटनेच्या कार्यक्रमामध्ये मुस्लीम समाजाला मस्जिदमध्ये घुसुन मारु असे विधान केले आहे. त्यांची ही कृती मुस्लीम समाज कदापि सहन करणार नाही. या व्यक्तीविरुध्द विविध जिल्हयामध्ये सबंधीत व्यक्तव्यावरुन गुन्हे दाखल झालेले आहेत. परंतु शासनातर्फे त्यांस अद्याप अटक झाली नाही, ही अत्यंत गंभीर बाब असुन समाजामध्ये असंतोष निर्माण करणारी आहे. या घटनेचे गांभीर्य लद्वसत घेऊन आमदार नितेश राणे व ज्यांनी अहमदनगर मध्ये जातीयवादी कार्यक्रम आयोजीत केला होता त्या संयोजकांना ताबडतोड अटक व कठोर शिक्षा करावी, अन्यथा रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी