August 9, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ऋतुजा गाढवेचा ज्ञानवंत पुरस्कार देवून गौरव

  • मोहा – ज्ञान प्रसार उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथील ऋतुजा रमेश गाढवे ही विद्यार्थिनी बारावी कॉमर्सच्या मार्च २०२४ परीक्षेत ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा संस्थेतून सर्वद्वितीय आल्याबद्दल शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘ज्ञानवंत पुरस्कार’ देऊन पुरस्कृत करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण नुकतेच कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात झाले. डॉ.महादेव गव्हाणे (प्राचार्य राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.ए. मैंदर्गी (संचालक, संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल, लातूर) हे होते तर
    प्रमुख पाहुणे म्हणून जयद्रथ जाधव (मराठी विभाग प्रमुख शिवाजी महाविद्यालय, रेणापुर) हे होते. तर ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल, सचिव डॉ.अशोक मोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
    हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर, मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप व उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!