धाराशिव (जिमाका)- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी १२ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.या योजनेतील ज्या पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही त्यांनी ते करुन घेवून योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक बालाजी काळे यांनी केले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु आहे.
जिल्हयात ४८ हजार ५०० लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द झाल्या आहेत.योजनेचा लाभ मिळणेकरीता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे.आधार प्रमाणीकरण केल्यानंतर लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. ४५ हजार ९८४ शेतकरी लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले असून, त्यापैकी ४४ हजार ६६४ शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर १३० कोटी ५८ लाख रुपये रक्कम वर्ग करण्यात आली आहे.अजुनही २ हजार ५०८ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी महा-आयटी यांनी ७ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ योजनेचा लाभ घ्यावा.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला