सध्या महाराष्ट्रामध्ये, जातिवादाने,बलात्काराने,खून दरोडा चोरी ने थैमान घातला आहे.तरीही काही वृत्तपत्रातून अशा बातम्या छापून येत नाही, काही पत्रक हे पैशाच्या पाठीमागे लागलेले आहे.गोरगरिबांच्या समस्या त्यांना दिसून येत नाही जे लोक पैसा देतात त्यांच्याच बातम्या वृत्तपत्रात छापून येतात, परंतु धाराशिव येथील कळंब तालुक्यामध्ये पत्रकार सुभाषजी घोडके साहेब हे निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात.त्यांनी नऊ वर्षांपूर्वी साक्षी पावन ज्योत या वृत्तपत्राचे रोपटे लावले होते आता ह्या वृत्तपत्राचे एक मोठे वटवृक्ष झाले आहे.गरीबाचा आणि दलितांचा आवाज या वृत्तपत्रामुळे मजबूत झालेला आहे. केवळ कळंब तालुक्यापुरते मर्यादित न राहता हे साप्ताहिक वृत्तपत्र संपूर्ण महाराष्ट्राचा बुलंद आवाज बनला आहे अशा ह्या निर्भीड पत्रकास नव्या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त भिम आर्मी मराठवाडा अध्यक्ष या नात्याने मंगलमय सदिच्छा देतो.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले