मुंबई – मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील इच्छुकांनीला भार्थ्यानी विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रासह २० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत,असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सन २०२४ – २०२५ करिता जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमां तर्गत पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविणेसाठी अनुदान उपलब्ध झाले आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई कस्तुरबा क्रॉस रोड न. २, कस्तुरबा महानगरपालिकेची मराठी शाळा क्र.2 सभागृह हॉल, तळमजला, बोरिवली पूर्व, मुंबई या पत्त्यावर अर्ज करावेत,असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
More Stories
“पायाभूत विकास मंडळ की ‘टेंडर मॅनेजमेंट’ यंत्रणा?” — आमदार कैलास पाटील यांचा सभागृहात खळबळजनक आरोप
२०३५ पर्यंत एसटी ताफा पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस