पारा – माणसांना माणसांशी जोडणारे महान कार्य करणारे डॉ.अण्णाभाऊ केवढी मोठी साहित्यसंपदा तयार करतात,तर त्या रचनांमध्ये माणसाला बदलण्याची,विचारपरिवर्तन करण्याची शक्ती आहे. त्यांचे विचार सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अशा जयंती उत्सवाची आवश्यकता आहे. या भूमिकेतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कमिटी साठेनगर, पारा यांच्या संकल्पनेतून वक्ते राहुल गिरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयंती कमिटीचे अध्यक्ष अतुल जाधव, उपाध्यक्ष केशव सिरसट, सहसचिव अजित जाधव, कोषाध्यक्ष दिपक सिरसट यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभिमन्यु गवळी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात जयंती साजरी करण्याचा उद्देश समाजपरिवर्तनाची चळवळ अखंड सुरू राहावी, हाच उद्देश कोरून ठेवला पाहिजे. अशी भुमिका व्यक्त केली. आपल्या व्याख्यानात बोलत असताना राहुलजी गिरी म्हणाले की,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची लेखणी अन्याय अत्याचारात दबलेल्या वर्गाला प्रकाशात आणून त्यांचे हुंकार अक्षरबद्ध करणारी होती. त्यांनी केलेले विपुल लेखन साहित्य विश्वातला सर्वोत्तम ठेवा आहे. संत तुकारामांपासून ते तुकाराम भाऊराव साठे अर्थात अण्णाभाऊ साठे ही विद्रोहाची व परिवर्तनाची परंपरा आजच्या तरूणाईने ज्ञात करून घेणे अधिक आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी जयंती कमिटीने राबवलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतूक केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जयंती कमिटीसह, भिमनगर मधील बांधव, नालंदा वाचनालय समिती यांनी विशेष प्रयत्न घेतले. व्याख्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत जाधव, प्रास्ताविक गवळी, व्याख्याते परिचय सुधीर शिनगारे आणि आभार अक्षय शिनगारे यांनी व्यक्त केले.यावेळी विष्णु हिंगणे, हनुमंत क्षिरसागर व साठेनगर आणि भिमनगर येथील नागरिक उपस्थित होते. व्याख्यानाला उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
More Stories
माजी विद्यार्थ्यांनी जपली शाळेची नाळ;जय भवानी विद्यालयात प्रेरणादायी मार्गदर्शन व खाऊ वाटप
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना जय भवानी विद्यालयात अभिवादन
जय भवानी विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा