August 9, 2025

वस्ती व शाळेभोवती घाण टाकणाऱ्यांवर कारवाई करावी

  • कळंब (महेश फाटक) शहरातील नगर परिषद हद्दीतील सावित्रीबाई फुले विद्यालय,भीम नगर व साठे नगरच्या बाजूला शहरातील चिकन व्यावसायिक व हॉटेल व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे यासंबंधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात पक्ष) च्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकारींना दिलेल्या निवेदनात पुढीलप्रमाणे म्हटले आहे.
    नगर परिषद कळंब हद्दीमधील सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या बाजूला शहरातील चिकन मटन व्यवसाय करणारे हे व्यावसायिक कोंबड्यांची घाण,चिकन व मटन याची घाण शाळेच्या बाजूला मोठा नाला आहे त्याच्यामध्ये टाकत आहेत. तसेच कळंब शहरातील सुप्रसिद्ध अनिल भोजनालय हे देखील हॉटेलची घाण टाकत आहेत. तरी सदरील विद्यार्थ्याचे व नागरिकाचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तरी नगरपालिकेने तात्काळ या बाबीकडे लक्ष देऊन सदरील दोषींवर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात पक्ष) च्या वतीने
    तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड,रहिवासी नागरिक जयसिंग तांबवे दिला.

error: Content is protected !!