लातूर – साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे एकूण साहित्य बहुजन समाजाचे दुःख व वेदना, व्यथा मांडणारे दिशा दर्शक होते. त्या मुळे डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील परिवर्तनवादी विचाराचा जागर सर्वत्र झाला पाहिजे तसेच नवपिढीने अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अभ्यासले पाहिजे असे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थेरो यांनी या वेळी केले. डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून पु. भिक्खु पय्यानंद थेरो यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भंतेजी पुढे बोलताना म्हणाले की,लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास हा अत्यंत खडतर संघर्ष में होता. दीड दिवस शाळेमध्ये जाऊन अथांग बहुजन साहित्य निर्माण करणारे एकमेव व्यक्तिमत्व जगाच्या इतिहासात झाले आहेत. तेव्हा डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या विचार कार्याची जयंती नव्या पिढीने साजरी करणे अपेक्षित आहे. या वेळी मातंग समाज चलो बुद्ध कि ओर अभियानाचे प्रमुख मा. डी.एस.नरसिंगे यांनी जयंती पर शुभेच्छा देताना म्हणाले कि, लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांचे एकूणच साहित्यातील तत्वज्ञान हे केवळ एका जातीपुरते मर्यादित नसून समस्त वंचित, पीडित गोरगरीब बहुजन समाजाच्या उन्नती व विकासासाठी होते. या वेळी भंते बुद्धशील,प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, प्राचार्य डॉ. संजय गवई यांनीही या वेळी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पु.भिक्खु पय्यानंद थेरो, पु. भंते बुद्धशील, पु. भंते मोग्गलायन, ₹मातंग समाज चलो बुद्ध कि और चे प्रमुख डी. एस.नरसिंगे, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, प्राचार्य डॉ. संजय गवई,अन्तेश्वर थोटे,ज्योतीराम लामतुरे,राजेंद्र हजारे,अनिरुद्ध बनसोडे,उदय सोनवणे,मिलिंद धावारे, मंगल कांबळे, आशा चिकटे, मंगल कांबळे ई. सह मोठया संख्येने धम्मसेवकांची उपस्थिती होती.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे