March 26, 2026

हरामखोर दिलीप जाधव याच्यावर तात्काळ कार्यवाही करा – बौद्ध अनुयायांची मागणी

  • कळंब – दिलीप जाधव चेरेकर नामक हरामखोर बौद्ध महिलांविषयी अत्यंत घाण व अश्लील भाषेत जातीवाचक व समाजविषयी घाणेरड्या भाषेचा वापर करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्ये सोशल मीडियावर इंन्स्टाग्राम,फेसबुकवर व्हायरल केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून त्याच्यामागे नेमका कोणाचा हात आहे हे शोधून काढून त्याच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी तालुक्यातील सर्व आंबेडकर प्रेमी नागरिकांच्या वतीने दि.१६ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
    या निवेदनात अनिल हजारे,सतपाल बनसोडे, राहुल हौसलमल,शिवाजी सिरसाट,बजरंग ताटे,कुणाल मस्के,अभिजित हौसलमल,राजाभाऊ टोपे,प्रविण देशमाने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
error: Content is protected !!