March 25, 2026

कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान

  • कळंब – कळंब तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या १५ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून,येत्या १८ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे.या निवडणुकीत एकूण ११८४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
    या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १६ ते २३ मार्च असून,२४ मार्च रोजी अर्ज छाननी होणार आहे.अर्ज माघारीची मुदत २५ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत आहे.मतदान १८ एप्रिल रोजी पार पडणार असून, त्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.
    संघाच्या १५ जागांपैकी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटासाठी ९ जागा,वैयक्तिक सभासदांसाठी १,अनुसूचित जाती-जमाती १,महिला राखीव २, इतर मागासवर्ग १ आणि विमुक्त/भटक्या व विशेष मागास प्रवर्गासाठी १ जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
    या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व इतर संस्थांचे १२३ मतदार,तर वैयक्तिक सभासदांचे १०६१ मतदार असे एकूण ११८४ मतदार मतदान करणार आहेत.
    सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कळंब तथा निवडणूक निर्णय अधिकारी बी.एच.सावतर यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
error: Content is protected !!