धाराशिव (जिमाका) – जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय हे पूर्वी सेंट्रल बिल्डिंगसमोर धाराशिव येथे कार्यरत होते. या जागेवर उद्योग भवन इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असल्याने जिल्हा उद्योग केंद्र हे कार्यालय आता तात्पुरते समर्थ मंगल कार्यालयासमोर,अमन कॉम्प्लेक्स, तळमजला,मेन रोड,गांधीनगर, येडशी रोड,धाराशिव येथे स्थानांतरित झाले आहे.कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच या कार्यालयाशी होणारा पत्रव्यवहार वरील पत्त्यावर करावा. असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र,धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान