यवतमाळ – महा एनजीओ फेडरेशन पुणे व आधारस्तंभ फाऊंडेशन यवतमाळ याच्या वतीने दि.२२ जुलै २०२४ रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यवतमाळ येथील दयाभाई पटेल या विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त महा फेडरेशन पुणे आणि आधारस्तंभ फाऊंडेशन यवतमाळ चे सचिव मंदाताई इंगोले, शाळेचे मुख्याध्यापक खर्चे याच्या हस्ते झाडे लावून कार्यक्रमाला सुरुवात केली.कार्यक्रमास चौधरी मॅडम, वानखडे मॅडम,राठोड सर,धुर्वेसर, दिपाली नेवारे, अंकुश गजभार, प्रफुल्ल गवली इत्यादीची उपस्थिती होती कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पल्लवीताई इगोले,अंकिता जाधव व शाळेतील मुलामुलींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
More Stories
कर्मा तेलंग क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले 2024 नॅशनल अवॉर्ड ने सन्मानित