कळंब – पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली प्रकरणी कळंब पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र किसन बहुरे,महादेव तात्याभाऊ मुंडे, वय-३७ वर्षे, पद-पोलीस हवालदार, पोलीस ठाणे, जिल्हा धाराशिव यांना लाच प्रतिबंधक विभाग धाराशिव च्या पथकाने यशस्वी सापळा लावित ताब्यात घेतले असून कळंब पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. यातील तक्रारदार यांचे मालकीचे उपळाई पाटी,सोलापुर धुळे महामार्ग, तालुका कळंब येथे दिनेश व्हेज/नॅानव्हेज या नावाचे रेस्टॅारंट असुन सदर धाब्या समोर काही दिवसापुर्वी ०३ शेळया व ०२ बकरे बेवारस मिळुन आले होते. सदर शेळया व बकरे तक्रारदार यांचे ताब्यात मिळालेबाबत तक्रारदार यांचेवर चोरीचा गुन्हा नोंद न करता तक्रारदार यांचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये किरकोळ कारवाई केली व तक्रारदार यांना मदत केली म्हणुन यातील आलोसे परि.पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे व पोलीस हवालदार महादेव मुंडे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष बक्षीस म्हणुन ५००० रुपये लाच रकमेची मागणी करुन आलोसे पो.ह. मुंडे यांनी पंचासमक्ष ५०००/- रुपये लाच रक्कम स्विकारली असता आलोसे पोउनि बहुरे व पो ह मुंडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सापळा कारवाईत मार्गदर्शक – संदीप आटोळे,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर .मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनात सापळा पथक सिद्धाराम मेहत्रे सापळा अधिकारी – उपाधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग धाराशिव पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख,मधुकर जाधव, नागेश शेरकर यांचा या पथकात समावेश होता.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश