धाराशिव (जिमाका) – जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून सन 2024-25 या वर्षात अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धनविषयक प्रशिक्षण देण्यासाठी 15 जुलै ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहे.17 ऑगस्टनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखाने, पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती येथे संपर्क साधावा.अर्जाचा विहित नमुना,मार्गदर्शक सूचना, नियम,अटी व सोबत जोडायची कागदपत्राची सूची पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच एन.आय.सी.धाराशिवच्या Dharashiv.nic.in या संकेतस्थळावर अर्जाचे नमुने उपलब्ध करून देण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी वरील योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला