धाराशिव (जिमाका) – कसबे तडवळा येथील जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जनजागृती कार्यक्रम पार पडला. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी एस.व्ही. अंकुश व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे व चाइल्ड हेल्प लाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बालहक्क व मुलांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.बालविवाहाविषयी माहिती देण्यात आली. बालकासंबंधीच्या विविध योजना आणि चाइल्ड हेल्प लाईन 1098 ची माहिती चाइल्ड हेल्प लाईनचे पर्यवेक्षक अमर भोसले व पल्लवी पाटील यांनी 1098 चाइल्ड हेल्पलाईनविषयी माहिती दिली. विद्यालयातील ए.आर.घोडके, आर.जे.,कोंकणे,बोराडे जे.बी., कोंकणे,एस. एस. पाटील,पो.के. ठाकरे.,ए.जे.कोरडे,डी.बी.खवले,एन. एम. थालके,एस. टी.पालके व श्री.माने हे शिक्षक उपस्थित होते.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
ग्रामीण जनतेसाठी सुलभ सेवा : ई-गव्हर्नन्समुळे धाराशिव प्रशासन अधिक गतिमान