लातूर – महात्मा बसवेश्वर वरिष्ठ महाविद्यालय, लातूर येथे बीए, बीकॉम, बीएस्सी आणि बीएसडब्ल्यू द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा तासिका प्रारंभ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा बसवेश्वर वरिष्ठ महाविद्यालयातील बीए, बीकॉम, बीएस्सी आणि बीएसडब्ल्यू द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी व पालकांचे महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते पुष्पहार तर विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी वाणिज्य शाखा समन्वयक डॉ. विजयकुमार सोनी, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. यशवंत वळवी, डॉ. सुजित हंडीबाग, डॉ. शितल येरुळे, डॉ. राहुल डोंबे, डॉ. सोमेश्वर पंचाक्षरी, प्रा. आशिष स्वामी, प्रा. नागेश जाधव, प्रा. सुमेधा अंबुलगे, प्रा. अर्चना लखादिवे, प्रा. सुजाता पाटील, प्रा. अश्विनी इंद्राळे, निकिता साळुंखे, गौरी घोडके, ऋतुजा अजगरे आणि कार्यालयीन प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिपत्रकानुसार वरिष्ठ महाविद्यालयाच्या तासिका दि. 15 जुलै 2024 पासून सुरू करण्याचे निर्देश असताना सुद्धा महाविद्यालयातील शाखा समन्वयक व विभागप्रमुख यांनी द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या तासिका दि. 11 जुलै 2024 पासून नियमितपणे सुरू केल्याबद्दल त्यांचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी मनःपूर्वक अभिनंदन सुद्धा केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.विजयकुमार सोनी यांनी केले तर आभार डॉ.यशवंत वळवी यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयातील बीए, बीकॉम, बीएस्सी आणि बीएसडब्ल्यू द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम बिरादार, बालाजी डावकरे, अशोक शिंदे आणि बालाजी होणराव यांनी परिश्रम घेतले.
More Stories
त्याग,समर्पण आणि प्रेरणेचा जागर;माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग