लातूर – समाजातील दिव्यांगाप्रती सहानुभूतीपेक्षा अनुभूतीची भावना जपत मराठवाड्यातील लातूर,बीड,धाराशिव,नांदेड, छत्रपती संभाजी नगर,जालना, परभणी आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यातील अंध शालेय विद्यार्थ्यांना टिफिन तर अंध दांपत्यांना संसार उपयोगी वस्तूचे किराणा सामान वितरण नुकतेच शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या शिवाजी हायस्कूल,लेबर कॉलनी, लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम बीअँड विजन फाउंडेशन (बिव्हीएफ) या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई, लातूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या शितल मालू,आंबेजोगाई येथील प्रसिद्ध व्यापारी सुहासजी पाठक, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर घारापूरकर,बीअँड व्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.माधव गोरे,सचिव संदीप चोपडे, कोषाध्यक्ष मीरा चोपडे, सहसचिव प्रशांत गवंडगावे आणि संचालक दशरथ सुरवसे यांची उपस्थिती होती. यावेळी मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी आणि हिंगोली या परिसरातील शालेय विद्यार्थी व अंध दांपत्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर व 10वी 12वी उत्तीर्ण शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी डॉ. संजय गवई बोलताना म्हणाले की, आपण दिव्यांग व्यक्तीच्या स्वाभिमानी जीवन जगण्याचे अभिनंदन केले पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात अडचणी सोडवण्यास आपण सदैव सक्रिय राहू अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले व यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शितलताई मालू म्हणाल्या की, आपण बीऑन विजन फाउंडेशन या संस्थेच्या आगामी सर्व उपक्रमात सक्रिय सहभागी होऊ अशी भावना व्यक्त केली. संस्थेच्या भावी दिव्यांगांसाठी आयोजित आयोध्या अध्यात्मिक सहल आयोजनास सक्रिय सहकार्य करू असे आश्वासित केले. सुधाकर घारापूरकर यांनी व्यावसायिक मार्गदर्शन करून संस्थेच्या वाटचालीचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माधव गोरे यांनी केले सूत्रसंचालन मीरा चोपडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशांत गवंडगावे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता अमोल निलंगेकर, सुभाष चिने, दशरथ सुरवसे आणि प्रशांत गवंडगावे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे