August 8, 2025

ऊसतोड कामगारांच्या ७३ मुलामुलींना शालेय साहित्य वितरण समारंभ संपन्न

  • बीड – मौजे जोला ता.केज येथील ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींना शेखरजी मुंदडा
    संस्थापक महाएनजीओ फेडरेशन आणि श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला पो देवगाव ता केज जि बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
  • जोला व परिसरातील ऊसतोड कामगारांच्या ७३ मुलामुलींना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर ( जोला ) ता केज जि बीड येथे मंगळवार दिनांक ०९ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता जोला व परिसरातील १० आणि १२ वी तील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना सन्मानित करण्यात आले तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींना शालेय साहित्य व दप्तर वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय शोभाताई लटपटे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी केज,लहुराज राऊत
    तालुका संरक्षण अधिकारी महिला व बालविकास विभाग
    केज .जहागीरदार एस एस विस्तार अधिकारी महिला व बालविकास विभाग पंचायत समिती केज, बाजीराव ढाकणे बीड जिल्हा समन्वयक महाएनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य, ह प भ महादेव महाराज घोळवे पिंपळगावकर या मान्यवर मंडळींची उपस्थित होती . या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला च्या सचिव सौ.आशाताई बाजीराव ढाकणे यांनी केले असून महा एनजीओ फेडरेशनने बहुमूल्य योगदान दिलेले आहे.
    यावेळी जयश्री मुंडे, मिराताई मुंडे मनोहर ढाकणे, फुलचंद ढाकणे, सकाळ माध्यम समूहाचे केज
    विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक गोविंद ढाकणे,श्रीमंत
    ढाकणे,योगेश
    ढाकणे, गणेश ढाकणे, सिध्देश्वर ढाकणे, भामाबाई ढाकणे , राहीबाई ढाकणे ,नागरबाई ढाकणे, प्रयागाबाई ढाकणे, मिरा ढाकणे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीमती लटपटे यांनी महाएनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य व श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला च्या या उपक्रमाचे कौतुक केले पुढे बोलताना म्हणाल्या की सौ.आशाताई ढाकणे यांनी प्रयत्न करुन ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींना शालेय साहित्य मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे या मदतीमुळे विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळेल असे उदगार लटपटे यांनी काढले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर च्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना श्रीराम माथेसुळ, सुरेखा खोगरे, आणेराव एस ए सर व श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला च्या सचिव सौ. आशाताई ढाकणे यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक महा एनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य चे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी केले.आभार अनंत सारुक मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोला यांनी मानले.
error: Content is protected !!