August 9, 2025

सोलापूर -तुळजापूर -धाराशिव नवीन रेल्वे मार्ग भूसंपादन प्रकरणात जिल्हाधिकारी हे लवाद अधिकारी

  • धाराशिव (जिमाका) – रेल्वे मंत्रालयाच्या मध्य रेल्वे विभागाने 4 मार्च 2024 रोजी एक अधिसूचना प्रसिद्ध करून सोलापूर- तुळजापूर- धाराशिव या नवीन रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रकरणात रेल्वेच्या सुधारणा कायदा 2008 मधील कलम 20 फ पोटकलम (6) नुसार या रेल्वे मार्गाच्या भूसंपादन प्रकरणात वाढीव मावेजा (मोबदला) मागणीची प्रकरणे निर्णयीत करण्यासाठी जिल्हाधिकारी धाराशिव यांची लवाद अधिकारी म्हणून रेल्वे मंत्रालयाने नियुक्ती केली आहे.
  • सोलापूर- तुळजापूर- धाराशिव या नवीन रेल्वे मार्गासाठी रेल्वे (सुधारणा) कायदा 2008 मधील तरतुदीनुसार भूसंपादन कार्यवाही सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,धाराशिव यांचेकडून करण्यात आलेली आहे.या नवीन रेल्वे मार्गासाठीच्या भूसंपादनामुळे बाधित शेतकरी यांना सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी जाहीर केलेला निवाडा मान्य नसल्यास त्यांनी लवाद अधिकारी तथा जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे मुदतीत लवाद संदर्भ दाखल करावे.जे लवाद संदर्भ उपजिल्हाधिकारी (भूसंपादन – समन्वय) जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पूर्वीच प्राप्त झाले आहे, त्याची छाननी करून लवाद कार्यालयामार्फत त्वरित सुनावणीचे कामकाज करण्यात येईल.याची संबंधित शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.असे जिल्हाधिकारी तथा लवाद अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!