February 9, 2026

आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शेवटपर्यंत लढा देणार – आ.गोपीचंद पडळकर

कळंब – येथील साई मंगलम येथे दि.१३ ऑक्टोबर २०२३ रोजी धनगर आरक्षण जागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर,शिवदास बिडगर,डॉ.रामकृष्ण लोंढे, शिवाजी शेंडगे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, महाराष्ट्रातील धनगर समाजात जागृती व्हावी व समाज एक संघटीत व्हावा या करीता येलडा (ता. अंबाजोगाई) येथून धनगर आरक्षण जागर यात्रेची सुरुवात झाली आहे, पहिल्या टप्प्यात वीस ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे.
सध्या धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही लढाई न्यायालयात चालू आहे,
सरकार सुद्धा याबाबत सकारात्मक आहे.यदा कदाचित दगाफटका झाला तर रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे.या करीता सर्वांनी एकजुट होण्याची गरज आहे.धनगर समाजाला एसटी आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात मिळावे म्हणून आरक्षणाची लढाई न्यायालयात चालु आहे. लढाई न्यायालयात चालू असताना सुध्दा मी धनगर समाजाची जनजागृती करण्यासाठी मी फिरत आहे.सरकारसुध्दा या बाबत जनजागृती करण्यासाठी मी फिरत सकारात्मक आहे.माझ्यावर हल्ला सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे आपण एकजुटीने राहणे गरजेचे आहे, आरक्षणाची लढाई आपल्या करीता महत्वाची आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळाल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथी होणार आहेत.
या माध्यमातून सरकारला सुध्दा धनगर समाजाची एकजुट दाखवण्याची गरज आहे. असे प्रतिपादन विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. यावेळी प्रस्तावित शिवाजी शेंडगे व सुत्रसंचलन संतोष कसपटे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने सकल धनगर समाज उपस्थित होता.

error: Content is protected !!