August 9, 2025

गोविंदपूर येथे श्रींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत

  • गोविंदपूर (अविनाश सावंत ) – अनंत कोटी, ब्रम्हांड नायक…चा जयघोष; भक्तिमय वातावरणात गोविंदपूर येथे ‘श्रीं’ च्या पालखीचे फटाक्या च्या अतिषबाजीने रांगोळी फुलाच्या साहाय्याने स्वागत करण्यातआले.
    हातात भगवे ध्वज, सोबत अश्व, अन् टाळ-मृदंगाच्या गजरात ‘अनंत कोटी…ब्रम्हांड नायक…महाराजधिराज…योगीराज…भक्त प्रतिपालक…शेगाव निवासी…समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय…’ असा जयघोष करत संत गजानन महाराज यांच्या पालखीसह वारकऱ्यांचे ५ जुलै रोजी दुपारी गोविंदपूर येथे आगमन झाले. यावेळी श्रींच्या दर्शनासाठी गोविंदपूर , देव धानोरा, हसेगाव, जवळा, एकुरका, बोरगाव,गौरगाव, खामसवाडी, मंगरूळ, परिसरातील शेकडो भाविकांनी गर्दी केली होती.
    दुपारी अडीच वाजता दरम्यान पालखीचे गोविंदपूर येथे आगमन झाले. श्रींच्या दर्शनाची ओढ असलेल्या भाविकांची दुपारी १२ वाजता पासूनच रिघ लागली होती. पालखीचे आगमन होताच श्रींच्या जय घोषाने परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. जवळपास तीन तासा पेक्षा अधिक वेळ पालखी थांबली होती. यावेळी वारकऱ्यांनी विश्रांती घेत वारक ऱ्याच्या अवडीचे बेसन भाकरीचा आस्वाद घेतला. विश्रांती नंतर पालखी पुढील मुक्कामासाठी ढोकी तेरणा कारखान्याकडे रवाना झाली.
error: Content is protected !!