धाराशिव (जिमाका)- राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था/गट यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार,वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, सेंद्रीय शेती कृषीभूषण पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार,वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार,वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार,युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जिल्ह्यात कृषी विभागामार्फत सन 2023 या वर्षामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती / गट / संस्था यांचे वरीलप्रमाणे कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.तरी जास्तीत जास्त शेतकरी /गट / संस्था/व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे.असेआवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे. विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव तयार करण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा गावातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी