August 8, 2025

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहामाही तालुकास्तरीय शिबीर

  • धाराशिव (जिमाका)- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिवच्या वतीने माहे जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.शिबीराचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
    उमरगा तालुक्यात दर महिन्याचा पहिला,दुसरा,तिसरा व पाचवा मंगळवार याप्रमाणे माहे जुलैमध्ये 2, 9, 16 व 30 जुलै रोजी.माहे ऑगस्टमध्ये 6,13 व 20 रोजी.माहे सप्टेंबरमध्ये 3, 10 व 24 रोजी.माहे ऑक्टोंबरमध्ये 1, 8, 15 व 29 रोजी. माहे नोव्हेंबरमध्ये 5, 12 व 19 रोजी आणि माहे डिसेंबरमध्ये 3, 10, 17 व 31 रोजी शिबीर आयोजित केले आहे.
    तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे दर महिन्याचा दुसरा व चौथा बुधवार याप्रमाणे माहे जुलैमध्ये 10 व 24 रोजी,माहे ऑगस्टमध्ये 14 व 28 रोजी,माहे सप्टेंबरमध्ये 13 व 25 रोजी,माहे ऑक्टोंबरमध्ये 09 व 23 रोजी,माहे नोव्हेंबरमध्ये 13 व 27 रोजी आणि माहे डिसेंबरमध्ये 11 व 24 रोजी शिबीर आयोजित केले जाणार आहे.
    परंडा तालुक्यात दर महिन्याचा दुसरा व चौथा गुरुवार याप्रमाणे माहे जुलैमध्ये 11 व 25 रोजी,माहे ऑगस्टमध्ये 8 व 22 रोजी,माहे सप्टेंबरमध्ये 12 व 26 रोजी,माहे ऑक्टोंबरमध्ये 10 व 24 रोजी,माहे नोव्हेंबरमध्ये 14 व 28 रोजी आणि माहे डिसेंबरमध्ये 12 व 26 रोजी शिबीर आयोजित केले जाणार आहे.
    लोहारा तालुक्यात दर महिन्याचा तिसरा शुक्रवार याप्रमाणे माहे जुलैमध्ये 19 रोजी,माहे ऑगस्टमध्ये 16 रोजी,माहे सप्टेंबरमध्ये 20 रोजी,माहे ऑक्टोंबरमध्ये 18 रोजी, माहे नोव्हेंबरमध्ये 22 रोजी व माहे डिसेंबरमध्ये 20 रोजी शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.
    भूम तालुक्यात दर महिन्याचा तिसरा गुरुवार याप्रमाणे माहे जुलैमध्ये 18 रोजी,माहे ऑगस्टमध्ये 19 रोजी,माहे सप्टेंबरमध्ये 19 रोजी,माहे ऑक्टोंबरमध्ये 17 रोजी,माहे नोव्हेंबरमध्ये 21 रोजी व माहे डिसेंबरमध्ये 19 रोजी शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.
    वाशी तालुक्यात दर महिन्याच्या तिसरा बुधवार याप्रमाणे माहे जुलैमध्ये 15 रोजी,माहे ऑगस्टमध्ये 21 रोजी,माहे सप्टेंबरमध्ये 18 रोजी, माहे ऑक्टोंबरमध्ये 16 रोजी व माहे नोव्हेंबरमध्ये 20 व माहे डिसेंबरमध्ये 18 रोजी या शिबीराचे आयोजन केले जाणार आहे.
    कळंब तालुक्यात दर महिन्याच्या दुसरा व चौथा सोमवार याप्रमाणे माहे जुलैमध्ये 8 व 22 रोजी,माहे ऑगस्टमध्ये 12 व 26 रोजी,माहे सप्टेंबरमध्ये 09 व 23 रोजी, माहे ऑक्टोंबरमध्ये 14 व 28 रोजी,माहे नोव्हेंबरमध्ये 11 व 25 रोजी आणि माहे डिसेंबरमध्ये 09 व 23 जून रोजी शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिराचा लाभ घ्यावा.असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!