धाराशिव (जिमाका) – वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या इतर मागासवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती (धनगर वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येणार आहे.सन 2024-25 या वर्षात महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालय / तंत्रनिकेतन येथे शासनाने निर्धारीत केलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांकरीता वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या इतर मागासवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र वसतीगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांचे मुलभूत पात्रता शैक्षणिक निकष व इतर निकष विहित केलेले आहेत.त्यानुसार या योजनेंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना, द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना,तृतीय वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांना व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या 150 विद्यार्थ्यांचे प्रती जिल्हा 600 विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत लाभ देण्याची प्रक्रिया सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, धाराशिव कार्यालयाकडे उच्च शिक्षणाचे द्वितीय,तृतीय व चतुर्थ वर्षाकरीता 20 जून ते 15 जुलै 2024 या कालावधीत अर्ज स्विकारले जातील. निवड यादी 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द होईल. उच्च शिक्षणाचे प्रथम वर्षकरीता 5 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत अर्ज स्विकारले जातील. त्याची निवड यादी 2 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. योजनेच्या विस्तृत अटी व शर्तीच्या माहितीसाठी संबंधित सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण,धाराशिव या कार्यालयाकडे संपर्क साधावा.असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
More Stories
व्यावसायिक गणेश घेवारे यांना मातृशोक
भगवंताचे गुण संतांमध्ये दिसतात – ह.भ.प.अच्युत आंबीरकर महाराज
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ