August 9, 2025

यशवंत व गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार

  • धारशिव – श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विदयालयात वैद्यकीय पूर्व परीक्षेतील (NEET) यशवंत व गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार संस्थाअध्यक्ष आदरणीय सुधीर अण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या यशवंत, गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. हुंबे वैष्णवी दादासाहेब ६५१,घाडगे रिया रामचंद्र ५४१,माळी रचना निवृत्ती ५८५, पठाण आफिया अकबर अली ५७८,साळुंके सृष्टी सुनील ५७३,सोनटक्के प्रताप काकासाहेब ५६७, साळुंके रुतुजा ५०४, देटे शिवराज बाप्पासाहेब ४८४, दिरगुले प्रथमेश सिताराम ४७९, घारगे अथर्व संतोष ४७६, पाटील रुषिकेश केशव ४७२,उंडे मेघा बापुसाहेब ४६९ इत्यादींचा समावेश आहे.
    धाराशिव जिल्हयातील गुणवंत विदयार्थी १० वी नंतर लातूर, औरंगाबाद, हैद्राबाद, कोटा अशा ठिकाणी जेईई (JEE) व नीट (NEET) च्या तयारीसाठी जातात. यामुळे पालकांना आर्थिक नुकसान होते. पालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये त्याच बरोबर विदयार्थ्यांना घरच्या वातावरणात तयारीसाठी जास्तीचा वेळ मिळावा, त्यांना योग्य अशा तज्ञ प्राध्यापकांकडून माफक फीसमध्ये मार्गदर्शन मिळावे हे उद्दिष्ट समोर ठेवून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने नीट (NEET), जेईई (JEE) परीक्षेसाठी श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विदयालय येथे फोटॉन (Photon Batch) व MHT-CET साठी फेनॉमेनॉल (Phenomenal Batches) सुरू करण्यात आल्या आहेत. या बॅचेसला शिकविण्यासाठी दिल्ली, कोटा येथील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक नेमण्यात आलेले आहेत. तसेच विदयार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेची सोय उपलब्ध आहे.
    फोटॉन व फेनॉमेनॉल बॅचची वैशिष्ट्य पहायची झाली तर त्यामध्ये दिल्ली, कोटा येथील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक, दर्जेदार मल्टीकलर प्रिंटेड स्टडी मटेरियल, सुसज्य ग्रंथालय व अभ्यासिका, बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी, चाप्टर वाईज ऑफलाइन परीक्षा घेणे व एसएमएस द्वारे पालकांना सराव परीक्षेचे गुण पाठवणे,
    डेली प्रॅक्टिस प्रोग्राम च्या माध्यमातून पालकांना निकाल देणे, दररोज डाऊट सॉल्विंग सत्र घेणे, अभ्यासपूर्ण नियोजन व दर पंधरा दिवसाला परीक्षा, मुलभूत व क्लिष्ट घटकांचे प्रोजेक्टरद्वारे सुस्पष्टीकरण, सुपर ३० नाईट स्टडी रूम चालवणे, नीट (NEET), जेईई (JEE) बॅचमध्ये स्मार्ट डिजिटल बोर्ड द्वारे शिक्षण, संपूर्ण कॅम्पस व वर्ग खोल्या कॅमेरा अंतर्गत असणे, दत्तक योजनेद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तीक लक्ष, नीट (NEET), जेईई (JEE) परीक्षेनंतर पुढील प्रवेशासाठी मार्गदर्शन इत्यादी घटकांचा अंतर्भाव आहे.
    या सत्कार समारंभावेळी संस्था अध्यक्ष सुधीर पाटील, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, संस्थेच्या सरचिटणीस सौ.प्रेमाताई सुधीर पाटील, संस्थेचे सदस्य तथा गुरुवर्य के.टी.पाटील फाउंडेशन प्रमुख यू.व्ही.राजे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी एस.एस. देशमुख, प्राचार्य एन.आर.नन्नवरे, उपप्राचार्य एस.के.घारगे, भगत ए.व्ही.फोटॉन बॅच प्रमुख कटियार,भौतिकशास्त्र प्रमुख,राजेश कुमार रसायनशास्त्र प्रमुख,अमित सिंग वनस्पतीशास्त्र प्रमुख,दानिश खान, प्राणीशास्त्र प्रमुख,संजय मिश्रा, गणित प्रमुख आदींची उपस्थिती होती. या सत्कार समारंभासाठी पत्रकार परिषदेचे विविध पदाधिकारी, पत्रकार,संस्थेचे विविध पदाधिकारी तसेच सर्व प्राध्यापक, विषयप्रमुख,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!