February 8, 2026

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात वित्तीय साक्षरतेबाबत जनजागृती

  • धाराशिव (जिमाका) – रिजर्व बैंक ऑफ इंडियाच्या ग्राहक शिक्षण विभागाच्या वतीने 31 मे रोजी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे वित्तीय साक्षरतेबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एन.एस. गंगासागरे यांच्या हस्ते आर.बी.आय. मुंबई येथील अधिकारी आकाश काबरा,जाधव, अक्षय तुंगा,तांबोळी,राणे, एस.बी.आय रिजनल हेड दास व त्यांचे सहकारी,अॅक्सिस बैंक धाराशिव प्रमुख हिरोळे व त्यांचे सहकारी या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून धन्वंतरी पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

    आकाश काबरा यांनी दैनंदिन जीवनात होणारे फायनान्शियल फ्रॉड व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली.अक्षय तुंगा यांनी सादरीकरणाद्वारे सर्व फिशिंग लिंक्स, फेक कॉल्स,फेक अँप्स,सिम कार्ड, फेक लोन अॅप्स,फेक लोन वेवसाईड,ओटीपी बेस्ड फ्रॉड अशा विविध ऑनलाईन फ्रॉडबद्दल उपयुक्त माहिती दिली.

    एस.बी.आय. आणि अॅक्सिस बैंक अधिका-यांनी बँकेच्यावतीने होणारे सहकार्य व उपलब्ध सुविधा याबाबत सविस्तर माहिती दिली.ऑनलाईन फ्रॉडपासून सावध कसे राहायचे याबद्दल संपूर्ण माहिती असलेल्या तीन उपयुक्त पुस्तिका,मोबाईल स्टैंड, किचैन (विथ बारकोड) यांचे कार्यक्रमातील सहभागी व्यक्तींना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबईच्या वतीने मोफत देण्यात आली.

    आर्थिक फसवणूकीचे बळी हे अधिक प्रमाणात उच्चशिक्षित डॉक्टर्स असल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यासाठी असा काही फ्रॉड झाला असल्यास त्याची तक्रार 14448 या टोल फ्री नंबरवर करता येईल व त्याची तक्रार इमेलद्वारे करता येईल याचे मार्गदर्शन करण्यात आले.

    कार्यक्रमाची सांगता अधिष्ठाता प्रा. डॉ.गंगावणे यांनी वरील विषयाची दैनंदिन जीवनामधील उपयुक्तता समजावून सांगितली.तसेच यासंदर्भात जागरूक आणि सतर्क राहण्याबाबत सांगितले.या कार्यक्रमात सर्व अध्यापक,पदव्युत्तर विद्यार्थी,इंटनर्स विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाला 300 जणांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार डॉ.मयुर देशमुख यांनी मानले.

error: Content is protected !!