February 9, 2026

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना

  • धाराशिव (जिमाका) – “राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन” ही योजना सन 1954 -55 पासून सूरू आहे.या योजनेकरिता जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव होते.तथापि,पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 16 मार्च 2024 च्या शासन निर्णयान्वये पूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करून सर्वसमावेशक अशी एकच सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे.

    “राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक व कलाकार” या योजनेचे नाव बदलून राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना” करण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत जिल्हयातील लाभार्थी निवडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील समिती गठीत करण्यात आली आहे.समितीमध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे सदस्य सचिव आहेत.

    जिल्हयातील सर्व वृध्द साहित्यिक व कलाकार लाभार्थी यांनी ही योजना उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद, धाराशिव यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे.यापूढे राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक व कलाकार योजनेच्या मानधन तसेच नवीन प्रस्ताव व इतर बाबींच्या चौकशीकरिता व योजनेच्या लाभासंदर्भामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत),जिल्हा परिषद,धाराशिव यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा समाज कल्याण,जिल्हा परिषद यांनी केले आहे.

error: Content is protected !!