शेळका धानोरा – येथील कु.संस्कृती कमलाकर शेवाळे ही विद्याभवन हायस्कूल येथे इयत्ता दहावी मध्ये ९८.४० % गुण घेऊन घवघवीत यश मिळवल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघ कळंब च्या वतीने येथे सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते विकासजी कदम , बाबासाहेब कांबळे, शैलेश गुरव,रंगनाथ कदम ( सेवानिवृत्त मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र ),परमेश्वर कदम ,बाबुराव पाखरे ,सुहास कदम , विक्रम शेवाळे , कमलाकर शेवाळे ( सचिव ,लोक कल्याण बहुउद्देशी सामाजिक संस्था तथा नेहरू युवा मंडळ कळंब ) , सौ.सानिका शेवाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बाबासाहेब कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात