August 9, 2025

राष्ट्रीय स्थापना दिन विविध कार्यक्रमाने साजरा .

  • कळंब – ईपीएस ९५ सेवा निवृत्त कर्मचारी समन्वय व लोक कल्याण संस्था राष्ट्रीय या संघटनेचा ६ जून स्थापना दिवस व छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन कार्यक्रम संत ज्ञानेश्वर बालकाश्रम कळंब येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी ७५ वर्ष पूर्ण झालेले सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू रामा शेळके ( ८२ ) व बशीर हजरत पठाण ( ८५ ) यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विशेष कार्य करणारे सेवानिवृत्त कर्मचारी व महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे धाराशिव विभागीय अध्यक्ष राजाभाऊ आंधळे,अरुण गायकवाड, बापूराव झाल्टे, प्रभू लिंग झोरी यांचा सत्कार करण्यात आला.ईपीएस – ९५ सेवानिवृत्त कर्मचारी गेली दहा वर्ष आपल्या अल्प पेन्शन मध्ये वाढ व्हावी यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एस.एन.आंबेकर मराठवाडा विभागीय अध्यक्ष दादा देशमुख यांच्या नेतृत्वात संघर्ष करीत आहेत केंद्र सरकार या विषयावर उदासीन आहे.हा प्रश्न लोकसभा सभागृहात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लावून धरला. त्यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदार संघातील ईपीएस – ९५ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला होता.त्यांचा प्रचंड मतानी विजय झाला आहे.याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव ईपीएस – ९५ सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अच्युतराव माने यांनी मांडला. उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात हा ठराव मंजूर केला.यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व संघटनेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अच्युतराव माने,सूत्रसंचालन सा. साक्षी पावन ज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत यांनी तर आभार राजाभाऊ आंधळे यांनी मानले.
error: Content is protected !!