धाराशिव (जिमाका) – सन २०१७ पासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य वाटपासाठी वापरात असलेले ई-पॉस मशिनची मुदत संपुष्टात आल्याने दि.६ जून रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे हस्ते त्याच्या कक्षात १० रास्तभाव दुकानदार यांना प्राधिनिधीक स्वरुपात नवीन ई-पॉस मशिन आणि आयआरआयएस स्कॅनरचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जिल्हयात एकुण १०७८ रास्तभाव दुकाने आहेत.जिल्हयातील सर्व रास्तभाव दुकानांमध्ये नविन ई-पॉस मशिन बसविण्याकरिता सिस्टम इटेग्रेटर कंपनीची निवड करण्यात आली असून त्याच्यामार्फत रास्तभाव दुकानदारांसाठी ८ ते १३ जून-२०२४ दरम्यान तालुकानिहाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. नविन ई-पॉस मशिनमध्ये आयआरआयएस स्कॅनर व फोर जी ची सुविधा दोन सीमकार्डसह देण्यात येणार आहे.तसेच हाताच्या बोटाचे ठसे उमटत नसतील तर ओटीपी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.यामुळे यापुर्वी जुन्या ई-पॉस मशिनला नेटवर्कच्या येत असलेल्या अडचणी दुर होण्यास मदत होणार आहे.तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सर्व योजनेच्या लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानदारांकडुन धान्याची उचल करतेवेळी ई-केवायसी व मोबाईल सिडींग पुर्ण करून घ्यावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला