धाराशिव – (माधवसिंग राजपूत ) आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने धाराशिव येथे ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उस्मानाबाद घेण्यात आली या कार्यक्रमात आरोग्य तपासणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांच्या हस्ते संपन्न झाले स्वच्छता मोहिमेत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला वृक्षारोपण करण्यात आले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भास्कर नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक दिनाचा मुख्य कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महादेव महाराज अडसूळ जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक महासंघ धाराशिव, डी के कुलकर्णी सचिव ज्येष्ठ नागरिक महासंघ मराठवाडा प्रदेश सुफी सय्यद मुख्याध्यापक भोईटे उमाकांत नायगावकर सेवानिवृत्त न्यायमूर्ती कुलकर्णी , समाज कल्याण अधिकारी गवळी, दानवे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव नायगावकर यांनी आपल्या मार्गदर्शनात ज्येष्ठ नागरिकांनी उत्तम आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच तसेच हसत खेळत आनंदी राहावे याविषयी आपले विचार व्यक्त केले. सेवा निवृत्त न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी ज्येष्ठ आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले प्रा, विशाल गरड यांनी आपल्या व्याख्यानात ज्येष्ठांचा मुलांनी सांभाळ करावा त्यांचे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे सांगून ज्येष्ठांचा आदर व सन्मान व्हावा असे विचार व्यक्त केले कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अच्युतराव माने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कुंभार,वासुदेव वेदपाठक, माधवसिंग राजपूत, वाशी तालुका अध्यक्ष हरून काझी, सचिव बळीराम जगताप यांचा सत्कार करण्यात आला आभार सहाय्यक आयुक्त अरवत यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज भोसले, अतुल जगताप, समाज कल्याण निरीक्षक विभीषण शिरसाट, युवराज चव्हाण, संकेत जगताप, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बी. यु. जगताप यांनी केले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी