August 9, 2025

हजरत ख्वाजा हामीदअली शहा उर्स उत्साहात साजरा

कळंब- कळंब येथे ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त हजरत ख्वाजा हामीदअली शहा दर्गा येथे उर्स मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र,विदर्भ,मध्यप्रदेश व कर्नाटक राज्यातील भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने आले होते. गेली तीन दिवस हा उत्सव चालला तीनही दिवस लंगर पद्धतीने 24 तास भोजनाची व्यवस्था आयोजक समितीकडून करण्यात आली होती. लाईट आणि डेकोरेशनची व्यवस्था नागपूरचे सोनूभाई यांनी केले .रविवारी झालेल्या कार्यक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, अक्षयजी मुंदडा यांनी हजरत ख्वाजा हामीद अली शहा यांच्या दर्गावर आशीर्वाद घेऊन बाबा हामीद अली शहा यांचे चिरंजीव अस्ताना ए आलियाचे सज्जादानशीन(उत्तरअधिकारी) डॉ. शहा जाकीर हामीदअली शहा व जद्देअला हज़रत सय्यद नवरुल्लाह हुस्सैनी इफ्तेखारी हैदराबाद यांच्यासह विचार व्यक्त केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, कृषी बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, मुस्ताक कुरेशी, डिकसळचे माजी सरपंच अमजद मुल्ला, कळंब पोलीस स्टेशनचे पीआय सुरेश साबळे, मुसदीक काजी, शकील काजी, मिनाज शेख, समीर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य डिकसळ इम्रान मुल्ला, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास कदम, हरिभाऊ कुंभार, सचिन काळे, विश्वजीत जाधव, सागर बाराते, अमन मोमीन, साजिद काजी, फाहद चाऊस, नारायण लांडगे, आनंद बलाई, मोहिद पाशा, मोसिनअली शाह, इम्रनअली शाह, तौफ़ीक़ अली, आदिल अली, शाह वसीम, शाह जलील, मुहम्मद अली शाह, शाह ख़ालिद, जोहद सय्यद, फरमान सय्यद, सुलेमान मिर्झा, खदीर खुरेशी यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!