कळंब ( माधवसिंग राजपूत ) – राज्य शासनामार्फत वृद्ध ,अपंग यांच्यासाठी संजय गांधी व श्रावण बाळ योजनेद्वारे मिळणारे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते असलेल्या बँकेत लाभार्थ्यांची यादी व धनादेश संजय गांधी योजना विभागाकडून पाठविली जाते व यादी नुसार संबंधित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात परंतु या यादीनुसार संबंधित लाभार्थ्यांच्या खाते जमा रक्कम करण्यासाठी वेळ लागत असे व लाभार्थ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागत असत परंतु आता शासन निर्णयाने हे अनुदान डीबीटी द्वारे संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात सरळ जमा करण्यात येणार आहे यासाठी लाभार्थ्याकडून बँक खाते, पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स , मोबाईल क्रमांक व हयात असल्याचे प्रमाणपत्र तलाठी कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले होते परंतु धाराशिव जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवार २८ मे पासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे धाराशिव येथील तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यासह मंडळ अधिकारी ,तलाठी आश्या चौघा महसूल कर्मचाऱ्यावर एक साध्या अर्जावर गुन्हा दाखल केला आहे व यातील काही कर्मचाऱ्यांना अटक देखील झाली आहे या विरोधात जिल्ह्यातील कोतवाला पासून अधिकाऱ्यापर्यंत १२०० महसूल कर्मचारी या लेखनिबंद आंदोलनात उतरले आहेत या आंदोलनात तलाठी यांचा सहभाग असल्याने वृद्ध ,अपंग लाभार्थी यांना हे कागदपत्र वेळेत जमा व्हावेत यासाठी धावपळ होत आहे .कळंब तहसील कार्यालयामध्ये विशेष टेबल ची व्यवस्था करू कागदपत्रे स्वीकारण्यात येत आहे याविषयीची तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील वृद्ध व अपंग लाभार्थ्यांना याविषयीची माहिती मिळालेली नाही कागदपत्र जमा करण्याची शेवटची तारीख ३० मे सांगण्यात आली होती परंतु हे कागदपत्रे ३ जून पर्यंत संबंधित तलाठी कार्यालय किंवा कळंब तहसील कार्यालय संजय गांधी योजना विभागाकडे स्वीकारली जाणार आहेत .तारखेच्या आत सदरील कागदपत्रे जमा न केल्यास अनुदानापासून या निराधारना वंचित राहावे लागणार आहे.तलाठी संपावर असल्याने याविषयीची माहिती ग्रामीण भागातील काही निराधार पर्यंत पोहोचलेली नाही या मुदतीत वाढ होणे गरजेचे आहे.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन