शिराढोण ( आकाश पवार ) – कळंब तालुक्यातील शिराढोण येथे सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे हे गाव. शिराढोण परिसरामध्ये तब्बल 36 खेडे वसतात या शिरढोणमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे बस स्टॅन्ड उपलब्ध आहे. खेड्यापाड्यांना शहराकडे जोडणारी जीवन वाहिनी म्हणून ओळखणारी आपल्या सर्वांचे लाडके एसटी बस चा आज मोठ्या उत्साहामध्ये वर्धापन दिन अख्ख्या महाराष्ट्रभर साजरी केला जातो.तसेच आज 76 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहांमध्ये साजरी करण्यात आला त्याप्रसंगी गावाचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सर्व गावकऱ्यांनी एसटी ड्रायव्हर कंडक्टर या सर्वांचा मूकभरून सत्कार केला व त्यांना या वर्धापन दिनानिमित्त समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याप्रसंगी सलमान बडे शेख, ताजखा पठाण, वसीम पठाण, पत्रकार अमोलसिंह चंदेल, राहुल ओमने, पवन म्हेत्रे, शिरढोण येथील ऑटो स्टॉप चे मोहसीन भाई, शाकीर भाई हे सर्व उपस्थित होते व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कळंब तालुका उपाध्यक्ष आकाश पवार आदींची उपस्थिती होती.
More Stories
श्री गुलाब महाराज दिंडीचे हरी नामाच्या गजरामध्ये स्वागत
कळंबमध्ये विकसित भारत संकल्प मेळावा संपन्न
विद्याभवन हायस्कूल कळंब येथे जागतिक ऑलिंपिक डे साजरा