February 9, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयास लावणीत पारितोषिक

  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक वर्ष (२०२३ – २४) मध्ये आयोजित केलेल्या केंद्रीय युवक महोत्सवात (४ ते ७ ऑक्टोबर ) शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ.दीपक सुभाषराव सूर्यवंशी (सांस्कृतिक विभाग प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रीय सहभाग नोंदवला. यामध्ये महाविद्यालयास लावणी कलाप्रकारात तृतीय पारितोषिक अभिनेत्री वर्षा ऊसगावकर, प्रविणकुमार दाळींबकर कुलगुरु प्रो.डॅा. प्रमोद येवले यांच्या हस्ते कलावंत राज अशोक सरवदे आणि संघ प्रमुख यांनी पारितोषिक स्वीकारले.
    यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ.सुनिल पवार, उपप्राचार्य डॉ.सतीश लोमटे व सिनेट सदस्य डॉ. संजय कांबळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
      यात तोष्णीवाल साक्षी,जोशी गायत्री, गायकवाड योजना, आडसूळ राही, मुल्ला झीनत, शेख हुजेफा, शेख ईब्राहीम हे स्पर्धक मूक अभिनय,वक्तृत्व,वादविवाद,चित्रकला,व्यंगचित्रकला, रांगोळी, स्पॉट फोटोग्राफी, प्रश्नमंजुषा, वासुदेव व लावणी या कलाप्रकारात सहभागी झाले.
           राष्ट्रीय एकात्मता या विषयावर उत्कृष्ट मूकअभिनय सादर केले. एकूण ११ कलाप्रकारात आठ विद्यार्थी कलावंत सहभागी झाले. तर महिला संघ प्रमुख म्हणून प्रा.डॉ.एम.बी.जाधव यांनी सहकार्य केले. युवा महोत्सव यशस्वीतेसाठी हनुमंत जाधव, संतोष मोरे, अरविंद शिंदे, संदीप सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल डॉ.डी.एन.चिंते, प्रा.रुपेश मानेकर, प्रा.प्रताप शिंदे, डॉ.एन.एम.अदाटे, डॉ.आर.व्ही.ताटीपामुल, प्रा. श्रीहरी बोबडे, डॉ.ए.बी.बोंदर, श्रीमती प्रा.एस.ए.वायबसे, अर्जुन वाघमारे तसेच महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!