August 9, 2025

आव्हाड शिरपुरा येथील ग्रामस्थांशी दुधगावकर यांनी संवाद साधला

  • शिराढोण (परमेश्वर खडबडे यांजकडून) –
    कळंब तालुक्यातील आवाड शिरपुरा येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यभर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी राज्याच्या विकासासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका यांनी ग्रामीण भागातील ग्रामस्थांशी संवाद साधने त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, त्या संदर्भात चर्चा करणे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. यानुसार राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी आव्हाड शिरपूर येथे शनिवारी (दि.७) सकाळी दहा वाजता बैठक घेत ग्रामस्थांशी संवाद साधला.
    यावेळी ग्रामस्थांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमधील विविध अडचणी नमूद केल्या. २०२३ मधील जिल्ह्यातील ५७ मंडळांना अग्रीम मिळावा, सततच्या पावसाचे राहिलेल्या अनुदान मिळावे, २०२२ चा खरीप पिक विमा समान पद्धतीने वाटप करावा, ५० हजार रुपये रेगुलर कर्ज भरणाºया शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात अजून मिळाले नाही ते मिळावे, शाळांचे खाजगीकरण थांबवावं, कंत्राटी नोकर भरती थांबवावी,पीक कर्ज देण्यासाठी काही राष्ट्रीयकृत बँका शिबीर व अनेक अडचणी सांगून कर्ज न करता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे,लासरा बॅरेजेसमध्ये गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा,कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त करावेत आदी मागण्या ग्रामस्थांनी मांडल्या. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी सतत प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दुधगावकर यांनी ग्रामस्थांना दिली.
    याप्रसंगी प्रकाश मुंदडा, डॉ.उत्तम खोडसे, भाऊसाहेब पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष किशोर आव्हाड, उपाध्यक्ष प्रदीप काळदाते, बबनराव काळदाते, श्रीराम काळदाते, दिलीप आव्हाड, सुबोध आव्हाड, काकाजी काळदाते, दत्ता आव्हाड, बळीराम काळदाते, प्रशांत आव्हाड, दौलत रिचपुरे, हनुमंत रिचपुरे, अनिल काळदाते, प्रशांत आव्हाड, श्याम आव्हाड, बिभीषण लोंढे, बन्सी भोसले, अंकुश भोसले, सत्यनारायण भोसले, वसंतराव काळदाते, पांडुरंग काळदाते, अमोल काळदाते, सुधाकर काळदाते, विनोद मोरे, वसंत लोंढे, गोपाळ आव्हाड, सुजित आव्हाड, रामचंद्र आव्हाड, शिवाजी काळदाते आदी ग्रामस्थ, शेतकरी, शेतमजूर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किशोर आव्हाड यांनी मानले.
error: Content is protected !!