पिंपळगाव(लिंगी) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुक्यातील पिंपळगाव(लिंगी) येथील संभाजी विद्यालयातील इ.10 वी बोर्ड परीक्षा मार्च 2024 निकालात एकूण प्रविष्ट विद्यार्थी – 49 असून एकूण उत्तीर्ण विद्यार्थी 48 आहेत.तर एकूण विद्यालयाचा सरासरी निकाल 97.95% लागला आहे. यामध्ये विशेष प्राविण्य 15 विद्यार्थी तर प्रथम श्रेणी – 26,द्वितीय श्रेणी 07 असून विद्यालयतून विशेष प्राविण्यसह प्रथम विद्यार्थी चि.सुकाळे आर्यन ज्योतीराम – 89.20%,कु. बोरकर योगीता बालाजी – 84.49%,कु .गाडे प्राजक्ता प्रविण- 82.60%,कु .सुकाळे ज्ञानेश्वरी दत्तात्रय – 80.60 लागता आहे. सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, संस्थेचे अध्यक्ष अनिल( बापू) मोहेकर, स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष ,प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी , विद्यालयातील विविध समित्याचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
More Stories
शिवशक्ती सहकारी साखर कारखानाच्या वतीने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार
वाशी येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज मागविले
हनुमंत पाटुळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित