August 9, 2025

प्रहार जनशक्तीच्या युवक तालुकाध्यक्षपदी निखील गंभिरे यांची निवड

  • कळंब – प्रहार जनशक्ती पक्ष कळंब तालुका कार्यकारणी दिनांक ८ आँक्टोबर २०२३ रोजी वार रविवारी कळंब शहरातील शासकिय विश्रामगृह येथे जिल्हा प्रमुख वर्षद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी जिल्हा प्रमुख केदार सौदागर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
    त्यामध्ये सर्वानुमते खालील पदाधिकारींची निवड करण्यात आली.
    दत्तात्र्य भारत गुळबिले जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव,बंडु चांगदेव कोल्हे तालुका प्रमख कळंब,निखील निळकंठ गंभिरे युवक तालुका प्रमुख कळंब,विश्वंभर भिमराव शेळके विधानसभा प्रमुख कळंब,
    धनाजी सर्जेराव पाटील प्रहार शेतकरी संघटणा तालुका प्रमुख कळंब,बंडु भाऊ ताटे प्रहार कळंब तालुका मार्गदर्शक, राजकुमार अडसुळ प्रहार कळंब तालुका मिडीया प्रमुख आदींची निवड करण्यात आली.
    याप्रसंगी दिनेश गुडे जिल्हा उपध्यक्ष धाराशिव, प्रजय पवार तालुका प्रमुख धाराशिव,आप्पा तरटे तालुका प्रमुख परंडा व सत्यदेव जगताप ग्रा.पं. सदस्य (ईटकुर ),संदीप गायकवाड,अभिजीत गंभिरे, सुधाकर इंगळे, अशोक उपाडे व सर्व प्रहार सैनिक कळंब उपस्थित होते.
error: Content is protected !!