- धाराशिव (जिमाका) – जिल्हयाच्या ठिकाणी इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यासाठी धाराशिव शहरात 100 मुलीसाठी -1 व 100 मुलांसाठी -1 या प्रमाणे एकूण 2 वसतिगृहे 13 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार मंजुर करण्यात आली आहेत.
वसतिगृहे सुरु करण्यासाठी इमारत भाडयाने घेवून वसतिगृहे सुरु करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. धाराशिव शहरात 100 मुलांच्या वसतिगृहासाठी सर्व सोयीयुक्त 1 इमारत भाडयाने घेण्यात येणार आहे. इमारत मालकाने आपल्या इमारतीत उपलब्ध सोयी/सुविधा,मालकी हक्काबाबतचे कागपदपत्रे व इमारतीचे फोटोसह आपले अर्ज जिल्ह्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यांच्याकडे 1 जून 2024 पर्यत सादर करावेत.विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक बाबासाहेब अरवत यांनी कळविले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान