कळंब – कळंब शहरातील प्रसिद्ध बांधकाम साहित्याचे व्यापारी दिलीपराव टोणगे यांचे चिरंजीव ॲड.प्रफुल्ल दिलीप टोणगे (B. A. L L B. L L.M)यांनी राष्ट्रीय प्रतिभुती बाजार संस्थान मुंबई (NISM)अंतर्गत महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई मधुन पोष्ट ग्रॅज्युएशन LL.M.गुंतवणुक व शेअर बाजाराचे फायदे या विषयात पुर्ण केल्या बद्दल बिक्कड सर मित्र परिवाराच्या वतीने पत्रकार बालाजी आडसुळ व उद्योजक विठ्ठल माने, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी ॲड प्रफुल्ल टोणगे यांनी बोलताना नवयुवक व विद्यार्थ्यांना आवाहन केले की, मेडिकल व इंजिनिअरींग क्षेत्रा व्यतिरिक्त देशात विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी भरपुर संधी आहेत.या साठी युवक व विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून विविध क्षेत्रात आपले नावलौकिक करावे असे प्रतिपादन केले.या प्रसंगी उपक्रमशिल शिक्षक महादेव खराटे, निशिकांत आडसुळ, कालिदास वनवे, व्यापारी दिलीप टोणगे, कळंब पत्रकार संघाचे विश्वस्त सतिश टोणगे,कर सल्लागार प्रतिक टोणगे , अशोक शिंपले उपस्थित होते.
More Stories
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू