August 8, 2025

मातोळा येथील श्री माधवराव भोसले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा १०० % निकाल

  • मातोळा (साक्षी पावन ज्योत वृत्तसेवा ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने लातूर जिल्ह्यातील मातोळा येथील श्री माधवराव भोसले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेचा निकाल100 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून प्रथम बर्डे ऐश्वर्या नेताजी 87, 17 %, द्वितीय कदम वैष्णवी सतीश 85.83, निलंगेकर आदित्य आप्पासाहेब 85.83, तृतीय शिंदे शाम दिगंबर 84.50, बिराजदार सुमित सुभाष 84.50, वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागलेला असून प्रथम राठोड योगिता प्रकाश 89.33%, द्वितीय सुरवसे अपेक्षा कोंडीबा 77.50,तृतीय काळे ऋतुजा नेताजी 77.33, कला शाखेचा निकाल 93.10% लागला असून यामध्ये प्रथम घोडके अंकिता विजयकुमार 69.83,द्वितीय पठाण रियाज बाबासाहेब 69.17, तृतीय ज्ञानेश्वर सुनील दत्त 68% लागला आहे. वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ.अशोक मोहेकर ,संचालक माणिकराव मोरे ,शालेय समितीचे अध्यक्ष भोसले दिगंबर,शालेय समितीचे सर्व सदस्य, संचालक संजय भोसले पर्यवेक्षक अजित साळवे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक व ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन केले.
error: Content is protected !!