August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.18 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 137 कारवाया करुन 1,09,350 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास:आरोपी नामे- 1) निता महादेव काळे, वय 35 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव या दि.18.05.2024 रोजी 15.00 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 8,000 ₹ किंमतीची 80 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास: जुगार विरोधी कारवाई दरम्यान दि.18.05.2024 रोजी 16.30 वा. सु. होळकर चौक कळंब येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- 1) रईस निजाम पठाण, वय 23 वर्षे, रा.इस्लापुरा ता. कळंब जि. धाराशिव, हे 12.40 वा. सु. होळकर चौक कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,700 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- आकाश दत्तात्रय मुळे, वय 24 वर्षे, रा.काळेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे रहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 17.05.2024 रोजी 23.00 ते दि. 18.05.2024 रोजी 06.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 5,000 ₹ नउ साड्या, मोबाईल फोन असा एकुण 58,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आकाश मुळे यांनी दि.18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- सुनिल चंद्रकांत आंबेकर, वय 40 वर्षे, रा. समता नगर 11 नं शाळेसमोर धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे रहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 17.05.2024 रोजी 22.00 ते दि. 18.05.2024 रोजी 06.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन लोखंडी कपाटातील 36 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचा पंचपाळ, छल्ला, आरत्या, लक्ष्मीची मुर्ती, वाळे, पैजन असा एकुण 1,44,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुनिल आंबेकर यांनी दि.18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सहदेव हनुमंत मिसाळ, वय 29 वर्षे, रा. कोंबडवाडी, ता.जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 7750 ही दि. 16.05.2024 रोजी 19.00 ते दि. 17.05.2024 रोजी 07.00 वा. सु. सहदेव मिसाळ यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सहदेव मिसाळ यांनी दि.18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : आरोपी नामे- यशवंत संजय माळी, 2) संजय संभाजी माळी, 3) मनोहर संभाजी माळी, 4) दयानंद संभाजी माळी सर्व रा. वडगाव सि. ता. जि. धाराशिव यांनी दि. 12.05.2024 रोजी 16.30 वा. सु. माळी समाजाचे समाज मंदीराजवळ वडगाव सिध्देश्वर येथे फिर्यादी नामे- रोहन दगडु मंगळे, वय 25 वर्षे, रा. वडगाव सि. ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, लाकडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व तुला जिवे ठार मारतो अशी धमकी‍ दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रोहन मंगळे दि. 18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-326, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-हणमंत प्रकाश ढोबळे, रा. जेवळी उत्तर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 10.05.2024 रोजी 20.00 वा. सु. सुलतान चिकन सेंटर जेवळी येथे फिर्यादी नामे- छाया संजय कल्यामोळ, वय 36 वर्षे, रा. जेवळी उत्तर ता. लोहारा जि. धाराशिव यांना व त्यांचा मुलगा सुनिल कल्यामोळ यांना नमुद आरोपीने मोटरसायकलने कट मारलेचे कारणावरुन शिवीगाळ करुन लोखंडी कटरने फिर्यादीच्या मुलास पोटावर मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- छाया कल्यामोळ यांनी दि. 18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 504, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • उमरगा पोलीस ठाणे : मयत नामे- निरंजन उमेश माळी, वय 30 वर्षे, रा. रामपुर ता. उमरगा जि. धाराशिव व सोबत आसिफ अब्दुल शेख, वय 19 वर्षे, रा. येळी ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.11.05.2024 रोजी 01.00 वा. सु. एनएच 65 रोडवरुन ट्रॅक्टर ट्रॉलीत जात होते. दरम्यान रामपुर पाटी येथे ट्रक क्र एमएच 12 टिव्ही 2295 चा चालक आरोपी नामे- मोहीद आदम मुजावर रा. साईनगर अक्कलकोट रोड सोलापूर जि. सोलापूर यांनी त्यांचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजीपणे रॉग साईडने चालवून निरंजन माळी यांचे ट्रॅक्टरला समोरुन धडक दिली. या अपघातात निरंजन माळी, आसिफ शेख हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अब्दुल रशीद शेख, वय 51 वर्षे रा. येळी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ), सह 184 मोवका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे : मयत नामे-यश ज्ञानेश्वर पाटील, वय 19 वर्षे, रा.उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि. 09.05.2024 रोजी 23.30 ते 24.00 वा. सु. शिवपुरी रोड उमरगा येथे शासकिय शौचालय समोरुन स्कुटीवरुन जात होते. दरम्यान कार क्र एमएच 12 जीव्ही 1176 चा चालक आरोपी नामे- संतोष माळी रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी त्यांचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजीपणे चालवून यश पाटील यांचे स्कुटीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात यश पाटील हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कैलास भानुदास आष्टे, वय 55 वर्षे, रा. अजय नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ), सह 134 (अ) (ब), 184 मोवका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!