येरमाळा (परमेश्वर खडबडे ) – सध्या देशात लोकसभा निवडणुक सुरळीतपणे पार पडत आहे.महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात दि.७ मे २०२४ रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. येरमाळा येथील दिव्यांग मतदार तुकाराम अंगत जाधव यांचे मतदान हे देवधानोरा यश गावात होते. मतदानासाठी पोस्टल मतदान कर्मचारी हे त्यांच्या येरमाळा येथील घरी येऊन दिव्यांग व वय वृद्ध व्यक्तीसाठी खूप मोलाचे सहकार्य करीत मतदानाचा लाभ मिळवून दिला. या प्रकाराबद्दल सर्व दिव्यांग व वृद्धाकडून निडणूक अधिकारी जिल्हाधिकारी ओम्बासे यांचे खूप खूप अभिनंदन करीत आहेत.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले