August 9, 2025

प्रकाश गायकवाड आणि हरीभाऊ पतंगे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

  • कळंब (अरविंद शिंदे ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या आस्थापना विभागातील कार्यालयीन अधिक्षक प्रकाश गायकवाड आणि हरीभाऊ पतंगे (सेवक) या पदावरून दोघांनीही ३० वर्षे प्रदीर्घ अशी सेवा पूर्ण केल्यानंतर ३० एप्रिल २०२४ रोजी हे सेवेतून सेवानिवृत्त झाले. 
    त्याबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते दोघांचेही शाल पुष्पहार आणि भर पेहराव करून सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्राचार्य डॉ.सुनील पवार, उपप्राचार्य डॉ.सतीश लोमटे उपस्थित होते.
        सुरुवातीस प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरूजी यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यांच्या या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रमांमध्ये त्यांच्याबद्दल डॉ.के.डबलू.पावडे, डॉ.आर.व्ही.ताटीपामूल, प्रा. डॉ.संदिप महाजन, डॉ.श्रीकांत पाटील,प्रा.डॉ.समाधान चंदनशिवे, प्रा.अनिल फाटक आदी उपस्थित होते. यावेळी अमोल सुरवसे, अजय भावे,उमेश साळुंखे, इक्बाल शेख,सीताराम बंडगर, विलास मुळीक,आदित्य मडके, बालाजी डिकले,भारत शेळके, अर्जुन वाघमारे,भारती मामा उपस्थित होते.
    सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी आणि आभार प्रदर्शन अरविंद शिंदे यांनी केले. सेवापूर्ती सत्कार कार्यक्रम यशस्वीतेसाठी हनुमंत जाधव,अनिल पवार,संतोष मोरे,रमेश भालेकर,अरूण मुंडे, धनंजय वाळजकर आदींनी परिश्रम घेतले.
    यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!