August 8, 2025

जनसेवा करण्यासाठी खा. ओमराजे यांना पुन्हा निवडून द्या – आनंदीदेवी

  • आळणी – खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गत ५ वर्षात मतदारसंघातील जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत.सर्वसामान्य जनतेच्या समस्या,प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मतदारांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खा.ओमराजे यांना जनसेवा करण्यासाठी पुन्हा निवडून द्यावे,असे आवाहन खा. राजेनिंबाळकर यांच्या मातोश्री आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांनी केले.
    उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खा. राजेनिंबाळकर यांच्या प्रचारासाठी आता पत्नी, भावजयीनंतर त्यांच्या मातोश्री आनंदीदेवी या देखील मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी धाराशिव तालुक्यातील आळणी येथे दौरा करून मतदारांशी संवाद साधला. तसेच मशाल या चिन्हावर मतदान करून खा. राजेनिंबाळकर यांना निवडून द्यावे, असे आवाहन केले. यावेळी पवनराजे निंबाळकर यांच्या भगिनी शिलाताई पाटील, अनुराधा जाचक,गोवर्धनवाडीच्या सरपंच निलावती लोमटे यांच्यासह साधना कोरे,नंदाबाई कोरे,विद्या वीर,उमाताई माळी, जयश्री वीर,ज्योती वीर, रत्नमाला वीर, दैवशाला तोडकर,रेणुका वीर,राधा वीर,जयश्री कोरे, शितुजा कोरे, काँग्रेस पक्षाचे विनोद वीर,रवि कोरे आळणीकर, ग्रामपंचायत सदस्य विनोद लावंड,
    ग्रामपंचायत सदस्य अनंत बापु खोबरे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ किरदत्त, सुनिल माळी, बबलू तोडकर, युवासेना तालुकाप्रमुख वैभव वीर, शिवसेना शाखा प्रमुख अजित वीर, शामसुंदर लावंड, अंबऋषी कोरे, अंकुश कोरे, विश्वजित वीर, समर्थ वीर, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!