August 8, 2025

प्राचार्य संजय भोसले यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

  • मातोळा (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – औसा तालुक्यातील मातोळा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या माधवराव भोसले विद्यालयाचे प्राचार्य संजय भोसले हे सेवानिवृत्त झाले. ज्ञान प्रसारक मंडळ ह्या संस्थेच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अनिल मोहेकर हे होते.यावेळी सचिव डॉ.अशोक मोहेकर,आमदार विक्रम काळे, आमदार अभिमन्यू पवार,शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, विवेक भोसले,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, सुरेश टेकाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अण्णासाहेब भोसले, शालेय समिती अध्यक्ष दिगंबर भोसले, संस्थेचे संचालक प्रा.अंजली मोहेकर,प्रा.वसंत मडके, सरपंच आशा भोसले, उपसरपंच गणेश भोसले, एम.डी.देशमुख उपस्थित होते.
    प्रास्ताविक दिगंबर भोसले यांनी केले. यावेळी डॉ.अशोक मोहेकर म्हणाले,आदर्श शाळा बनविण्याचे काम प्राचार्य संजय भोसले यांनी मुख्याध्यापकपदाच्या कार्यकाळात केले.भोसले यांच्यासारखे कर्तृत्ववान मुख्याध्यापक निवृत्त होत आहेत, याची खंत देखील मोहेकर यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य संजय भोसले म्हणाले,अशोक मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करताना त्यांची वेळोवेळी खंबीर साथ आणि केलेल्या कामासाठी कौतुकाची थाप मिळाल्यामुळे माझा उत्साह वाढला. खऱ्या अर्थाने मला मुख्याध्यापकाच्या कार्यकाळात काम करण्याची संधी मिळाली. कार्याची पावती म्हणून संस्थेने मला दोनवेळा ज्ञानदीप पुरस्काराने सन्मानित केले,असे ते म्हणाले.
    या कार्यक्रमाकाचे सूत्रसंचालन विजयकुमार शिनगारे यांनी केले.
error: Content is protected !!